माश्यांनी हैराण केलंय? सुटकेसाठी करा हे सोपे घरगुती उपाय
पावसाळा सुरू झाला की दमट हवामान आणि कचऱ्यामुळे घरात माश्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. माश्या केवळ अन्नाची नासाडी करत नाहीत, तर कॉलरा, टायफॉइड आणि गॅस्ट्रो यांसारखे अनेक गंभीर आजार पसरवण्यास कारणीभूत ठरतात. अशावेळी माश्यांना घालवण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकल स्प्रे वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच आज आपण अशा काही नैसर्गिक आणि सोप्या घरगुती उपायांची माहिती घेऊयात. ज्यामुळे घरातील माश्या काही मिनिटांत पळून जातील.
माश्या घाणीकडे लवकर आकर्षित होतात. त्यामुळे घरात कुठेही खरकटं अन्न किंवा ओला कचरा उघडा ठेवू नका. कचरापेटी नेहमी झाकून ठेवावी.
पाण्यात थोडे लवंग तेल, निलगिरी तेल किंवा पुदिन्याचा अर्क मिसळून घरात फवारणी केल्यास माश्या पळून जातात. माश्यांना या तीव्र वासाची ॲलर्जी असते.
घरात सकाळ-संध्याकाळ कापूर किंवा कडुनिंबाच्या पानांचा धूर केल्यास माश्या पळून जातात.
घराच्या खिडकीत किंवा दाराजवळ तुळस, पुदिना किंवा झेंडूची रोपे लावावीत. यांच्या सुगंधामुळे माश्या घरात येत नाहीत.
घर पुसताना पाण्यात थोडे मीठ आणि पांढरा व्हिनेगर किंवा फिनाईल टाकून फरशी पुसल्यास जमिनीवरील जंतू मरतात आणि माश्या बसत नाहीत.
सफरचंदाच्या एका तुकड्यात काही लवंगा खोचून तो तुकडा खिडकीजवळ किंवा दारात ठेवावा. हा माश्यांना पळवण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे.
कांद्याचा रस काढून तो खिडक्यांच्या किंवा दाराच्या चौकटीवर लावल्यास माश्या आत येत नाहीत.
हेही वाचा – तुम्हीही एकदा वापरलेले कपडे धुता? मग वाचा लॉंड्रीचे नियम
Comments are closed.