भाजीमध्ये मसाले केव्हा टाकावेत ?
स्वयंपाक करणे ही एक कला आहे. ज्यांच्याकडे या कलेतले प्रावीण्य असते त्या उत्तम स्वयंपाक बनवतात . पण काही ठरविक व्यक्तींनाच हे प्रावीण्य अवगत असते. यामुळे त्यांनी बनवलेला प्रत्येक पदार्थ चवीष्ट लागतो.
तसेच तज्ज्ञांच्या मते पदार्थाची चव त्या पदार्थाच्या ताजेपणावर जेवढी अवलंबून असते तेवढेच पदार्थ सुगंधी आणि चवीष्ट व्हावे यासाठी तुम्ही त्यात मसाले केव्हा टाकले त्यावरही अवलंबून असते. यामुळे मसाल्यांचे ाटीमिंग जर तुम्हाला अचूक माहीत असेल तर तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ टेस्टी होऊ शकतो. त्यासाठी काय करावं ते बघूया.
फोडणी केव्हा द्यावी
डाळ, भाजी, उसळ हे पदार्थ बनवताना तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी द्यावी.
कांदा परतल्यावर सर्वप्रथम हळद घालावी. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतावे.
टोमॅटो घातल्यावर लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला किंवा इतर सुके मसाले घालून १–२ मिनिटे परता. त्यामुळे मसाल्याचा कच्चा वास जातो.
भाजी शिजत असताना आवश्यकतेनुसार मीठ घालावे.
मीठामुळे भाजीतील पाणी सुटून ती लवकर शिजते.
सगळ्यात शेवटी गरम मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर किंवा लिंबाचा रस घातल्यास सुगंध आणि चव अधिक खुलते.
मसाले जास्त वेळ किंवा खूप मोठ्या आचेवर भाजू नका. त्यामुळे ते करपतात आणि भाजीची चव कडू होऊ शकते.
Comments are closed.