DMart मध्ये शॉपिंग? या सीक्रेट ट्रिक्सने वाचतील हजारो रुपये

वीकेंड असो वा महिन्याची सुरुवात, घरातील किराणा, आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती असते डी-मार्ट. इथे एकाच ठिकाणी सर्व वस्तू तर मिळतातच शिवाय भरघोस डिस्काउंटही मिळते. त्यामुळे घरातून निघताना कितीही लिस्ट करून गेलो तरी तेथे गेल्यावर ऑफर्स पाहून जास्तीची खरेदी होते. अनेकदा फक्त 500-600 रुपयांचं सामान घ्यायचंय म्हणून आत जाणारे लोक बाहेर येताना 2 ते 3 हजारांचं बिल करून येतात. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सीक्रेट ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही डी-मार्टमध्ये शॉपिंग करताना हजारो रुपये वाचवू शकता.

डी मार्टमध्ये 4 ते 5 गोष्टी घ्यायच्या असतील तरी आपण आपण ट्रॉली घेतो. परंतू, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, रिकामी ट्रॉली माणसाला ती भरण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे जर तुम्हाला कमी सामान घ्यायचं असेल, तर आवर्जून हातातील बास्केट वापरा.

स्वस्त आणि चांगल्या ऑफर्सच्या वस्तू नेहमी सर्वात खालच्या किंवा वरच्या शेल्फवर ठेवल्या जातात तर महाग वस्तू सहजपणे डोळ्यांना दिसतील अशा ठेवल्या जातात. त्यामुळे खरेदी करताना खाली-वर पाहायला विसरू नका.

डाळी, पोहे, साबुदाणा, सुकामेवा किंवा क्लिनिंग प्रॉडक्ट्स खरेदी करताना इतर मोठ्या ब्रँड्सऐवजी डी-मार्टचा स्वतःचा इन-हाउस ब्रँड DMart Premia निवडा. हे प्रॉडक्ट्स गुणवत्तेत उत्तम असतातच शिवाय स्वस्तही असतात.

कोणतीही वस्तू फ्री मिळतेय म्हणून ती उचलण्यापूर्वी स्वतःला विचारा, याची मला खरंच गरज आहे का? अनेकदा एक्सपायरी डेट जवळ आलेल्या किंवा न खपणाऱ्या वस्तूंवर बाय वन गेट वन फ्री ऑफर्स असतात.

घरातून निघताना लागणाऱ्या वस्तूंची यादी घेऊन जा. स्टोअरमध्ये गेल्यावर फक्त यादीतील वस्तू आधी खरेदी करा. यामुळे वेळेची आणि पैशांची दोन्हीची मोठी बचत होईल.

हेही वाचा – पावसाळ्यात मुलांना घरातच गुंतवून ठेवतील ‘हे’ मजेदार उपक्रम

Comments are closed.