सिल्क किंवा बनारसी साडीवरील तेलाचे हट्टी डाग कसे काढाल?
सण-समारंभ असो वा एखादे लग्नकार्य सिल्क आणि बनारसी या पारंपरिक साड्या नेसल्याशिवाय महिलांचा साज पूर्ण होत नाही. पण, जितक्या या साड्या देखण्या असतात, तितकीच त्यांची काळजी घेणे कठीण असते. एखाद्या कार्यक्रमात जेवताना साडीवर पदार्थांचा डाग पडला की थेट ड्रायक्लिनिंगचा पर्याय निवडला जातो. परंतू प्रत्येकवेळी साडी ड्रायक्लिनिंगला देणं महागात पडू शकते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून पाहायला हवेत.
सिल्कचे कापड अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यावर सामान्य कपड्यांप्रमाणे कोणताही कडक साबण किंवा ब्रश वापरता येत नाही, कारण यामुळे साडीचा रंग आणि जर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगत आहोत. remove oil stains from silk saree
बेबी शॅम्पू
सिल्क, बनारसी साडीचा कपडा अतिशय नाजूक असतो. त्यामुळे हे कापड स्वच्छ करण्यासाठी हार्ड डिटर्जंट वापरणे टाळा. हार्डं डिटर्जंट वापरल्याने कपड्यांचा रंग फिका होऊ शकतो. सिल्क, बनारसी साडी धुण्यासाठी बेबी शॅम्पू वापरायला हवा.
कॉर्न स्टार्च
भाजी, तूप किंवा बटरसारखे तेलकट पदार्थ साडीवर पडल्यास कॉर्नस्टार्च किंवा वापरू शकता. डाग पडलेल्या भागावर कॉर्नस्टार्च टाका आणि काही मिनिटे तसेच असूद्या. या ट्रिकमुळे अतिरिक्त तेल शोषले जाते. नंतर मऊ कापडाने ती पावडर अलगद साफ करा.
टॅल्कम पावडर
डाग पडलेल्या भागावर थोडी टॅल्कम पावडर शिंपडून काही मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाते.
व्हाईट व्हिनेगर
साडीवर चहा, कॉफी किंवा फळांच्या रसाचे डाग पडले असतील तर एक कप पाण्यात एक चमचा व्हाईट व्हिनेगर मिसळून त्याचे द्रावण तयार करा. कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते हलक्या हाताने डागांवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. हा उपाय डाग कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा – तुम्हीही एकदा वापरलेले कपडे धुता? मग वाचा लॉंड्रीचे नियम
Comments are closed.