शुभंशू शुक्ला 8 जून रोजी अंतराळ स्थानकात उतरण्यासाठी
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आता 8 जून रोजी अॅक्सिओम मिशन-4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहे. हे अभियान आधी 29 मे रोजी होणार होते पण आता प्रक्षेपण वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे नासाने ‘एक्स’वर स्पष्ट केले आहे. अंतराळ स्थानकाच्या उड्डाण वेळापत्रकाचा आढावा घेतल्यानंतर अनेक मोहिमांच्या प्रक्षेपण तारखा बदलण्यात आल्या आहेत. अॅक्सिओम मिशन-4 हे 8 जून रोजी संध्याकाळी 6:41 वाजता (भारतीय वेळेनुसार) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल.
अॅक्सिओम मिशन-4 मध्ये चार देशांतील चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार भारतातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू शुक्ला मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौमधील अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (एनडीए) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तेथून पदवी प्राप्त केली. एनडीए ही भारतातील सशस्त्र दलांसाठी (सेना, नौदल आणि हवाई दल) ऑफिसर कॅडेट्सना प्रशिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे. प्रशिक्षणाव्यतिरिक्त ते शैक्षणिक पदव्या देखील प्रदान करते.
Comments are closed.