कशिश चौधरी बलुचिस्तानची असिस्टंट कमिशनर

25 वर्षीय कशिश चौधरी हिची पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या असिस्टंट कमिशनरपदी नियुक्ती झाली. प्रशासकीय स्तरावर नियुक्त होणारी ती पहिली पाकिस्तानी हिंदू महिला आहे. बलुचिस्तान पब्लिक सर्विस कमिशनची तिने परीक्षा दिली होती. चागाई जिह्यात राहणारी कशिश सोमवारी वडील गिरधारी लाल यांच्यासोबत बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेण्यासाठी क्वेटा येथे पोचली. महिला तसेच मुख्य प्रवाहातून बाहेर असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी काम करणार असे कशिशने सांगितले.

Comments are closed.