Veer savarkar grand memorial will be built wherever he was imprisoned minister ashish shelar announces in marathi


महाराष्ट्र शसानाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे.

Veer Savarkar : पोर्ट ब्लेअर : ज्या तुरुंगात स्वा. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्या सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार शुक्रवारी अंदमान – निकोबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या दौऱ्यात अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. (veer savarkar grand memorial will be built wherever he was imprisoned minister ashish shelar announces)

ज्या सेल्युलर जेल मधे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे. यापूर्वी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित ऍड. शेलार यांनी हा विषय केंद्र सरकारकडे मांडला होता. याबाबत स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि संकल्पना अधिक स्पष्टपणे विषद करता यावी म्हणून ऍड. शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिवांची भेट घेतली.

महाराष्ट्र शसानाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून, स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, असा विश्वास ॲड. शेलार यांनी व्यक्त केला आहे.





Source link

Comments are closed.