बँक ऑफ बडोदा भरतीसाठी स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे प्रशिक्षण वर्ग

बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिस असिस्टंट (शिपाई) या पदाकरिता नोकरभरती होणार आहे. यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी संपर्प साधावा, असे आवाहन महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांच्याकडून करण्यात आले आहे.

n इच्छुक उमेदवारांनी www.bankofbaroda.in/Career.htm या संकेतस्थळावर शुक्रवार 23 मेपर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवार दहावी पास असावा, उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गाकरिता शासकीय नियमानुसार असेल तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सवलत असेल. या नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.