96 टक्के! जुळ्यांचे गुणही जुळले!! बीडच्या जुळ्या बहिणींची कमाल

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यशोगाथा ऐकायला मिळत असताना बीड जिह्यातील जुळ्या बहिणींनी अगदी सेम टु सेम गुण मिळवून सर्वांचेच लक्ष वेधले. आष्टी येथील धीरज देशपांडे यांच्या जुळ्या मुली अनुष्का आणि तनुष्का दोघींनी दहावीत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. एकसारखे गुण मिळाल्यामुळे संपूर्ण जिह्यात या जुळ्या बहिणींची चर्चा आहे. आष्टीच्या दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या या बहिणी अभ्यासात सुरुवातीपासून हुशार होत्या असे शिक्षकांनी सांगितले.
मात्र दोघींना अगदी समान गुण मिळतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्या दोघी एकत्र अभ्यास करत होत्या. दोघींनाही नृत्याची आवड असून त्या शालेय उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायच्या. एकसारखे गुण मिळतील याबाबत विचारही केला नव्हता. मात्र निकाल लागल्यावर खूप आनंद झाला, असे अनुष्का देशपांडे हिने सांगितले.
Comments are closed.