फळे: फळ खातात त्याच्यावर हे पाणी नाही.
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यातील सर्वच पोषक घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे तज्ज्ञमंडळी फळे खाण्याचा सल्ला देतात. नियमित फळांचे सेवन शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. सध्या प्रचंड उकाडा सुरू आहे. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रसयुक्त फळे खाल्ली जातात. बाजारात सध्या अनेक हंगामी फळे उपलब्ध आहेत. मात्र, तुम्हाला कधी घरातल्या मंडळीनी असे सांगितले आहे का? फळे खातोस पण पाणी पिऊ नकोस.. घरातली मोठी माणसं हा सल्ला आपल्याला कायम देतात. आपण ऐकतो आणि सोडून देतो. यामागचा विचार करत नाही. आज आपण अशी काही फळे जाणून घेणार आहोत, ज्या फळांच्या सेवनानंतर पाणी पिऊ नये आणि त्यामागील कारणे काय आहेत.
जांभूळ –
उन्हाळ्यात मिळणारा रानमेवा म्हणजे जांभूळ. शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते. पण, तुम्ही जर जांभळावर लगेचच पाणी प्यायल्यात तर सर्दी किंवा खोकला होऊ शकतो.
टरबूज –
टरबूज खाल्ल्यावर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. कारण या फळात पाण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस होऊ शकतो.
आंबा –
आंब्यावर पाणी प्यायल्यास आबंट ढेकर, सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञमंडळी आंबा खाल्ल्यानंतर जवळपास 1 तासाने पाणी प्यावे.
पेरू –
पेरू फायबरयुक्त फळ आहे. यात व्हिटॅमिन ए, सी, फॉलिक ऍसिड, पोटॅशियम, कॉपर आदी पोषकतत्वे आढळतात. त्यामुळे पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर आहे. पण, असे सर्व असले तरी पेरू खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये, यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
कलिंगड –
कलिंगड उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खाण्यात येते. पण, डॉक्टरांच्या मते, कलिंगड खाल्ल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पोट बिघडून लूज मोशन सुरू होण्याची शक्यता अधिक असते.
केळी –
केळी पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. पोटाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, केळीवर चुकूनही पाणी पिऊ नये. असे केल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
सफरचंद –
सफरचंद खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. पण, तुम्ही जर सफरचंद खाल्ल्यावर लगेचच पाणी पिणार असाल तर यामुळे पचनक्रिया बिघडते. गॅस आणि अपचनाचा त्रास सुरू होतो.
हेही पाहा –
Comments are closed.