खरंच विश्वास बसणार नाही! रिचर्ड्स म्हणाले, ‘या' संघाकडे आहे जगातील सर्वात घातक गोलंदाजी!

जगातील महान खेळाडू विवियन रिचर्ड्स यांनी त्या संघाबद्दल वक्तव्य केले आहे, ज्या संघातील गोलंदाजी बघून आश्चर्य वाटेल. रिचर्ड्सचा विश्वास बसत नाही की वर्तमान क्रिकेटमध्ये या संघाचे गोलंदाज जगातील सर्वात घातक गोलंदाज आहेत. सायरस सेजच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या इंटरव्यू दरम्यान रिचर्ड्सने त्या संघाबद्दल भाष्य केले आहे आणि म्हटले आहे की, वर्तमान क्रिकेटमध्ये भारताची गोलंदाजी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा अधिक मजबूत आहे.

सायरस सेज पॉडकास्ट वर विवियन रिचर्ड्स यांनी म्हटले की, कोण विश्वास ठेवू शकते की भारतीय संघाकडे अशा प्रकारची घातक गोलंदाजी असेल. आज भारतीय संघात सर्वात घातक गोलंदाज आहेत. एकदा मी सुनील गावस्कर यांच्यासोबत बसून कॉमेंट्री करत होतो. वेस्टइंडीजमध्ये कसोटी सामना चालू होता, भारतीय संघ सुद्धा खेळत होता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि एक अजून गोलंदाज होता. जो स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर होता. मला वाटते की तो भुवनेश्वर कुमार असेल.

विवियन रिचर्ड्स पुढे म्हणाले, त्या सामन्यात वेस्टइंडीजकडे सुद्धा चार गोलंदाज होते. मला आठवते की, मी गावस्कर साहेबांसोबत कॉमेंट्री करत होतो. मी गावस्करांकडे पाहिले आणि म्हटले, “अरे यार मी तो दिवस सुद्धा पाहिला आहे, जेव्हा वेस्टइंडीजची गोलंदाजी खतरनाक होती आणि आज मी तो दिवसही पाहत आहे जेव्हा भारतीय संघाकडे वेस्टइंडिजच्या गोलंदाजांपेक्षा जास्त घातक गोलंदाज आहेत. भारतीय गोलंदाज वेस्टइंडीजच्या गोलंदाजांपेक्षा अधिक पटीने मजबूत आहेत. तुम्ही याच पद्धतीने पुढे जात रहा असेही ते म्हणाले.

वेस्टइंडीज क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे. 70 ते 90 पर्यंत वेस्टइंडीजकडे खतरनाक गोलंदाज आहेत. पण आता वर्तमानात सध्या क्रिकेटमध्ये वेस्टइंडिज क्रिकेट संघात घातक गोलंदाजांची कमी आहे. हेच कारण आहे की, महान खेळाडू विवियन रिचर्ड्स सुद्धा वेस्टइंडीज संघाच्या वर्तमानतील अवस्था बघून चिंतेत आहेत.

Comments are closed.