कर्जाचा फास; दिग्दर्शक आशीष उबाळे यांची आत्महत्या

प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशीष उबाळे यांनी नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उबाळे यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आशीष उबाळे यांचा लहान भाऊ नागपुरातील रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करत होता. त्यांना भेटण्यासाठी  नागपुरात आले होते. रामकृष्ण मठाच्या गेस्ट रूममध्ये शनिवारी दुपारी आराम करण्यासाठी ते गेले. त्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सायंकाळी आशीष उबाळे यांचा भाऊ सारंग त्यांना उठवण्यासाठी गेला असता रूम उघडली नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांना मृत आशीष यांच्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये डोक्यावर प्रचंड कर्ज असल्याचे आत्महत्या केल्याचे नमूद आहे.

अनेक मालिका, चित्रपटांचे दिग्दर्शन

आशीष उबाळे यांनी टीव्हीसाठी ‘गजरा’, ‘अग्नी’, ‘एका श्वासाचे अंतर’, ‘किमयागार’, ‘चक्रव्यूह’ अशा मालिकांचे दिग्दर्शन केलं. त्यानंतर त्यांनी ‘गार्गी’, ‘आनंदाचे डोही’ आणि ‘बाबूरावला पकडा’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. ‘गार्गी’ हा चित्रपट कार्ल्सबर्ग चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला.

Comments are closed.