आयआयटीचे तुर्की विद्यापीठांसोबतचे शैक्षणिक करार स्थगित

हिंदुस्थान आणि तुर्कीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने तुर्की विद्यापीठांसोबतचे शैक्षणिक सहकार्य आणि सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केले आहेत. जेएनयू, जमिया मिलिया इस्लामियासारख्या विद्यापीठांनी तुकाaसोबतचे करार रद्द केले आहेत. आयआयटी रुरकीनेही इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबतचा आपला सामंजस्य करार अधिकृतपणे रद्द केला आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत मुंबई आयआयटीने हे करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.