600 पाकिस्तानी ड्रोन नष्ट झाले

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या सहाशेहून अधिक ड्रोन्सचा आकाशातच नाश केला अशी नवी माहिती आता समोर आली आहे. ही सर्व ड्रोन्स भारतातील सेनाकेंद्रे आणि नागरी वस्त्या यांच्यावर सोडण्यात आली होती. तथापि, पाकिस्तान असे काहीतरी करणार हे आधीच ताडून भारताने आपली व्यापक वायुरसंक्षण यंत्रणा आधीपासूनच सज्ज ठेवल्याने पाकिस्तानचे मनसुबे पार उधळले गेले, असे गेल्या दोन दिवसांमध्ये पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे.

1000 संरक्षण तोफांची व्यवस्था

पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवण्याची प्रभावी व्यवस्था भारतीय भूदलाने आधीच केली होती. गुजरातपासून पहलगामपर्यंतच्या संपूर्ण सीमाभागात 1000 हून अधिक वायुहल्ला संरक्षक तोफा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पाकिस्तानच्या ड्रोन्सनी भारताच्या वायुकक्षेत प्रवेश करताच त्यांच्यावर या तोफांमधून मारा केला जात होता. या तोफा अत्याधुनिक असून त्यांचा मारा अचूक असतो. त्यामुळे पाकिस्तानने ड्रोन्सच्या लाटांवर लाटा सोडण्याचा प्रयत्न करुनही भारताने त्याचे सर्व डावपेच उधळून लावले. या तोफांप्रमाणेच आकाश या स्वदेशनिर्मिती क्षेपणास्त्रानेही पाकिस्तानने सोडलेली सर्व क्षेपणास्त्रे जमीनीवर पाडविली आहेत.

कोणत्या तोफांचा उपयोग…

  1. एल-70 वायुसंरक्षक तोफ- ही तोफ भारताने 70 च्या दशकात स्वीडनकडून घेतली आहे. या गन मधून मिनिटाला 300 हून अधिक गोळ्यांचा मारा करता येतो. त्यांचा पल्ला 3 किलोमीटर ते 4 किलोमीटर आहे. या गन्सचे आधुनिकीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर आता उच्च कोटीचे सेन्सर्स, कॅमेरा आणि रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे या गन्सचा उपयोग रात्रीच्या गडद अंधारातही करता येतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
  2. झेडयू-23 एमएम- या गन्स 1980 च्या पूर्वार्धात रशियाकडून आयात केल्या आहेत. ही दोन बॅरलच्या गनमधून एकंदर मिनिटाला 3,200 ते 4,000 गोळे डागले जातात. या सैनिकांनी चालविण्याच्या तोफा आहेत. त्यांचा पल्ला 2 ते अडीच किलोमीटर आहे. या तोफांवरही आता सेन्सर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणा संस्थापित करण्यात आल्या असल्याने त्यांची क्षमता वाढली आहे. या तोफांच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्ताच्या असंख्य ड्रोन्सचा खात्मा झाला आहे.
  3. शिल्का गन व्यवस्था-या यंत्रणेकडून दोन झेडयू 23 तोफांची जोडणी स्वयंच लित प्लॅटफॉर्मर वर केली जाते. हा प्लॅटफॉर्म स्वयंचलित असतो. या यंत्रणेतील तोफा सेनेच्या वाहनांमधूनही कार्यरत केल्या जाऊ शकतात. त्यांची वहनक्षमता अधिक असते. या यंत्रणेतील जुळ्या तोफांची मारक क्षमता 8 हजार गोळ्या प्रतिमिनिट अशी आहे. या प्रवास करणाऱ्या तोफा असल्याने कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही चढउतारांवर त्यांचा परिणामकारकरित्या उपयोग होऊ शकतो.

Comments are closed.