टोल भरण्यासाठी थांबलो; कारला जोरदार धक्का अन् मोठा आवाज, रविकांत तुपकरांच्या वाहनाचा अपघात; ट्र
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">धाराशिव: राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघातांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी पारगाव टोल नाक्याजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने तुपकर यांच्या इनोवाला दिली पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर लातूर जिल्ह्यात जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.
ईनोव्हा कारला कोणीतरी जोरदार धक्का…
तुपकरांच्या कार चालकाने दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, बीडकडे जाणाऱ्या लेनमध्ये टोल भरण्यासाठी थांबलेले असतानाच पाठीमागून त्यांच्या ईनोव्हा कारला कोणीतरी जोरदार धक्का दिल्याचं त्यांना जाणवलं. त्याचबरोबर मोठा आवाज आला व गाडी थोडी पुढे सरकली. त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी गाडीतुन खाली उतरून मागे पाहिले असता त्यांच्या गाडीला पाठीमागुन ट्रकने धडक दिल्याचे लक्षात आले. ट्रकमध्ये एक क्लिनर व ड्रायव्हर बसलेले होते. त्यानंतर ट्रक चालकांकडे त्याचे नाव गावाबाबत विचारणा केली असता त्याने अडखळत्या आवाजात नाव संभाजी विठ्ठल डोंगरे रा, संभाजी चैक पंढरपूर असे असल्याचे सांगितले. त्याचे डोळे लाल झाल्यासारखे दिसत होते, त्यानंतर ट्रकचालकास ट्रकमधुन खाली उतरून बाजुला घेऊन जाऊ लागलो असता त्याला व्यवस्थीत चालता येत नव्हते, तसेच तो बोलत असताना त्याचे तोंडातून दारूचा उग्र वास येत होता, त्यावरून तो दारू पिलेला असल्याचे लक्षात आलं, अशी माहिती देखील तुपकरांच्या वाहन चालकाने दिली आहे.
त्याचबरोबर ट्रक चालकासोबत असणाऱ्या व्यक्तीचं नाव सागर अषोक साळुंखे रा पंढरपूर असे आहे. त्यानंतर तुपकरांच्या वाहन चालकासह कारमधील इतरांनी टोलनाक्याच्या सुपरवायजर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवल्यावरून पारगाव टोलनाका येथे वाशी पोलीस स्टेशन येथील पेट्रोलींगचे कर्मचारी दाखल झाले, त्यांनी ट्रक चालकासह ट्रकला ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये रविकांत चंद्रदास तुपकर (माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई) हे असल्याने सदरचा प्रकार हा अपघात आहे किंवा घातपात आहे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी आणि ट्रक चालकाविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी तुपकरांच्या कार चालकाने केली आहे.
Comments are closed.