असं झालं तर 3 संघांना थेट प्लेऑफचं तिकीट, मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढणार?

आयपीएल 2025 उर्वरित स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे आणि प्लेऑफच्या दृष्टीने स्पर्धा अधिकच रंजक होत चालली आहे. 58 सामन्यानंतर आता चार संघांच्या प्लेऑफच्या आशा संपल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ प्लेऑफ रेसमधून बाहेर झाले आहेत. तसेच सहा संघ अजूनही प्लेऑफच्या रेस मध्ये टिकून आहेत. चला तर जाणून घ्या कोणते संघ कोणत्या परिस्थितीत प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतात.

स्पर्धेतील दोन सामने रविवारी होणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानची टक्कर पंजाब विरुद्ध होणार आहे, तसेच दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा सामना गुजरातशी होईल. पहिल्या सामन्यात राजस्थान पंजाबला पराभूत करण्यात यशस्वी ठरली, तर याचा फायदा बंगळुरू संघाला होईल आणि ते प्लेऑफमध्ये थेट स्थान मिळवतील. तसेच दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीचा पराभव केला तर या सोबतच गुजरात सुद्धा प्लेऑफमध्ये स्थान निर्माण करेल.

जर रविवारी श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलची टीम विजय मिळवण्यात यशस्वी ठरली, तर पंजाब गुजरात आणि आरसीबी तीनही संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करतील. पण जर पंजाब आणि दिल्लीने सामना जिंकला तर या स्पर्धेत रोमांच आणखी वाढेल, जिथे मुंबई इंडियन्स सहित बाकीच्या सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

Comments are closed.