धोनीचेच फॅन्स खरे, बाकीच्यांचे पेड; हरभजनसिंहचे मोठे विधान

महेंद्रसिंह धोनीचेच फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे फॅन्स हे पेड आहेत असे विधान हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने केले आहे. तसेच धोनीने अजूनही खेळलं पाहिजे असेही हरभजन म्हणाला आहे.

महेंद्रसिंह धोनी हा हिंदुस्थान क्रिकेट टीमचा माजी खेळाडू आहे. त्याच्याच नेतृत्वात 2011 साली हिंदुस्थानने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीने 2020 साली निवृत्त झाला होता. धोनी आजही चेन्नई सुपरकिंग्जसाठी खेळतोय.

धोनीचे फॅन्स खरे आहेत असा दावा हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने केला आहे. एका कार्यक्रमात हरभजन सिंह म्हणाला की धोनीने अजूनही खेळलं पाहिजे, माझी टीम असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता. मला वाटतं की खरे फॅन हे धोनीचेच आहेत. बाकीच्यांचे फॅन हे पेड आहेत. बाकी जे फॅन्स आहेत ते बनवलेले आहेत सोशल मीडियावर. तुम्ही इकडे तिकडे नंबर पाहता ते सोडून द्या असेही हरभजन सिंह म्हणाला.

Comments are closed.