200 प्रवासी, पायलट बेशुद्ध आणि 10 मिनिटे विमान हवेतच

लुफ्थांसा एअरलाईन्सचे एक विमान तब्बल 10 मिनिटे पायलटशिवाय हवेतच असल्याचा धक्कादायक प्रसंग घडला. कॉकपिटमध्ये असलेला एकमेव को-पायलट बेशुद्ध पडल्यानंतर 10 मिनिटे विमान पायलटशिवाय हवेतच होते. खरे तर ही घटना 2024 साली घडली होती. त्याबद्दलचा अहवाल आता मिळाला आहे.

17 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रँकफर्टहून स्पेनमधील सेव्हिल येथे जाणाऱ्या एअरबस ए321 चा मुख्य कॅप्टन शौचालयात गेला होता. त्या वेळी कॉकपिटमध्ये असलेला को-पायलट बेशुद्ध पडला, असा अहवाल स्पॅनिश अपघात तपास प्राधिकरणने दिला आहे. या विमानात 199 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. तब्बल 10 मिनिटे विमान पायलटशिवाय उड्डाण करत होते. ऑटोपायलट यंत्रणेमुळे को-पायलटशिवाय विमान हवेत स्थिरपणे उड्डाण करत राहू शकले. त्यावेळी कॉकपिटमध्ये मात्र विचित्र आवाज रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments are closed.