रत्नागिरीच्या जगबुडी नदीत कार कोसळली, पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरीतील जगबुडी नदीत एक कार कोसळली आहे. या अपघातात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक गाडी मुंबईहून देवरुखच्या दिशेने जात होती. तेव्हा मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीत ही कार कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा अपघात नेमका झाला कसा याचे कारण कळालेले नाही.

Comments are closed.