SC On Vijay Shah’s Apology : मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू…

SC On Vijay Shah’s Apology : मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू…

विजय शाह-सोफिया कुरेशी: मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर विजय शाह यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोर्टात काय काय घडलं?

– विजय शाह यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग म्हणाले की, त्यांनी माफी मागितली आहे.

न्यायमूर्ती- तुमची माफी कुठे आहे? कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी बरेच लोक माफी मागतात. आम्हाला अशा माफीची गरज नाही.तुम्हाला पदाच्या प्रतिष्ठेची पर्वा नाही. तुम्ही जबाबदारी दाखवायला हवी होती.

न्यायमूर्ती- आम्ही सैन्याचा खूप आदर करतो.

मनिंदर – मी मनापासून माफी मागतो.

न्यायमूर्ती- आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही. हे मगरीचे अश्रू आहेत…

मनिंदर- मी बिनशर्त माफी मागतो.

न्यायमूर्ती- मग तुम्ही बाहेर जाऊन म्हणाल की तुम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार माफी मागितली आहे.

न्यायमूर्ती- तुमच्या विधानानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर न्यायमूर्तींनी मध्य प्रदेश पोलिसांच्या वकिलाला विचारले की काय कारवाई केली जात आहे. वकिलाने सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर इंदूर पोलिस तपास करत आहेत. न्यायालयाने म्हटले की कारवाई निष्पक्ष असावी.

न्यायमूर्ती- आम्ही 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करत आहोत.

न्यायमूर्ती- आम्ही खटल्यातील तथ्ये पाहिली. आम्ही थेट भरती झालेल्या 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी तयार करत आहोत. एमपी कॅडरचे हे अधिकारी मूळचे एमपी बाहेरील असतील. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत डीजीपींनी एसआयटी स्थापन करावी.

न्यायमूर्ती- एसआयटीचे नेतृत्व आयजी दर्जाचा अधिकारी करेल. एक महिला अधिकारी देखील असेल.

न्यायमूर्ती- याचिकाकर्त्याने तपासात सहकार्य करावे. त्याला सध्या अटक केली जाणार नाही.

न्यायमूर्ती- एसआयटीने आम्हाला वेळोवेळी रिपोर्ट द्यावा. पहिला रिपोर्ट 28 मे रोजी द्यावा.

Comments are closed.