अल्कराज इटालियन ओपनचा नवा चॅम्पियन

स्पेनच्या कार्लोस अल्कराजने किताबी लढतीत यजमान इटलीच्या यानिक सिनरचा पराभव करून इटालियन ओपनचे विजेतेपद पटकाविले. इटालियन ओपनचा नवा चॅम्पियन ठरलेल्या अल्कराजचे यंदाच्या हंगामातील हे तिसरे विजेतेपद होय. कार्लोस अल्कराजने अव्वल मानांकित यानिक सिनरचा 7-6(7/5), 6-1 असा पराभव करीत इटालियन ओपनच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. या जेतेपदासह अल्कराज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. मोंटे कार्लोमधील जेतेपदानंतर अल्कराजचा हा या वर्षातील दुसरा मास्टर्स 1000 किताब ठरला. याचबरोबर अल्कराजने सिनरच्या 26 विजयाची मालिकाही खंडित केली. सिनरला गतवेळीदेखील अल्कराजनेच चायना ओपनच्या फायनलमध्ये हरविले होते. 2024 च्या सुरुवातीपासून सिनरला पराभूत करणारा अल्कराज हा एकमेव खेळाडू होय. यजमान इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हिने इटालियन ओपनमध्ये महिला एकेरी व महिला दुहेरी असे दोन्ही किताब जिंकून ऐतिहासिक दुहेरी धमाका केला.

Comments are closed.