महाराष्ट्र वाहतूक सेनेचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची आरटीओ कार्यालयाकडून विविध कारणांनी मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे, याचा आज जोरदार निषेध करण्यात आला. नव्या आदेशाने वाहनांना सोळा अंकी स्पीड गव्हर्नर बसविण्याची करण्यात आलेली सक्ती रद्द करावी, नूतनीकरण प्रमाणपत्र, हेडलाईट सेटिंग, रेडियम यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना पक्षप्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयावर वाहनांसह धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदींच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.
Comments are closed.