LSG vs SRH: हैदराबादचा 6 विकेट्सने विजय! लखनऊच्या प्लेऑफच्या आशांवर पाणी

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात 19 मे रोजी आयपीएल मधील 61 वा सामना खेळला गेला, या सामन्यात लखनऊ आणि हैदराबाद दोन्ही संघांनी शानदार फलंदाजी केली. पण शेवट हा सामना हैदराबादने त्यांच्या नावावर करत लखनऊच्या प्लेऑफच्या आशांवर पाणी फिरवले आहे. लखनऊसाठी मिचेल मार्शने आणि एडन मार्करमने अर्धशतकी पारी खेळली. याशिवाय हैदराबादसाठी अभिषेक शर्माने सुद्धा अर्धशतक झळकवत लखनऊच्या फलंदाजांना घाम फोडला. त्यामुळे लखनौला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. याच पराभवाने लखनऊ प्लेऑफ रेसमधून मधून बाहेर पडली आहे.

लखनऊसाठी मिचेल मार्शने आणि एडन मार्करमने 115 धावांची भागीदारी रचली. मिचेलने 39 चेंडूत 65 धावा केल्या, तसेच मार्करमने सुद्धा 38 चेंडूत 61 धावा केल्या. याचबरोबर निकोलस पूरणने 26 चेंडूत 45 धावांची पारी खेळली. लखनऊच्या या तीन फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली होती, परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही.

206 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने 18.2 षटकात हा सामना त्यांच्या नावावर केला. हैदराबादसाठी सर्वात जास्त धावा अभिषेकने केल्या त्याने यादरम्यान 20 चेंडूत 59 धावा करत ज्यामध्ये 4 चौकार आणि 6 षटकार झळकावले. याशिवाय ईशान किशनने सुद्धा 28 चेंडूत 35 धावा केल्या.

हैदराबादसाठी ईशान मलिंगाने 4 षटकात 28 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केले. याशिवाय हर्षल पटेल 1 विकेट घेतली. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज तो ठरला. तसेच दिग्वेश राठीने लखनऊसाठी 2 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने सुद्धा 1 विकेट घेतली. या पराभवामुळे लखनऊचा या हंगामातील सफर इथेच संपला आहे.

Comments are closed.