'ऑपरेशन सिंदूर' वर ओनग्रेस-बीजेपी संघर्ष
परराष्ट्रमंत्र्यांच्या मौनावर राहुल गांधींची टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरवरून अखेर केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या मौनावरून काँग्रेस सतत भाजपला लक्ष्य करत आहे. सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरले.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला हल्ल्याची माहिती देण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मौन निषेधार्ह आहे, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच पवन खेडा यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. आम्ही ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिली होती, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले होते. परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला का सांगितले? याला कूटनीति म्हणतात का? ही हेरगिरी आहे, की देशद्रोह आहे, हा गुन्हा आहे. असे खेडा म्हणाले.
काँग्रेसच्या आरोपांवर परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर
ऑपरेशन सिंदूरशी संबंधित परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया मंत्रालयाने पूर्णपणे नाकारली आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यांमध्ये तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर केलेला आरोप परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी फेटाळून लावला.
Comments are closed.