SRH vs LSG IPL 2025: अभिषेकची बॅट स्विंग, हैदराबाद किंग
एसआरएच वि एलएसजी आयपीएल 2025: काल झालेल्या लखनौ विरुद्ध हैदराबाद या सामन्यात हैदराबाद संघाने लखनौ संघाची पार्टी खराब करून टाकली…आणि त्यांना प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर काढले…कालचा दिवस गाजवीला तो युवराज याच्या चेल्याने म्हणजेच अभिषेक शर्मा याने…२० चेंडूतील ५९ धावांच्या आपली खेळी त्याने ६ षटकाराने सजविली….काल त्याने आपल्या गुरु सारखे षटकार मारून सामना एकतर्फी केला…त्याच्या १४० धावांच्या खेळीनंतर सचिन यांनी ट्विट करून त्याच्या बॅट स्विंग चे कौतुक केले होते…त्याच बॅट स्विंग चे प्रात्यक्षिक त्याने नवाबांच्या शहरात दाखविले.
आकाशदीप यांच्या चेंडूवर त्याच्या डोक्यावरून मारलेला नयनरम्य षटकाराने त्याने सुरुवात केली…आणि बिष्णोई याच्या गोलंदाजीवर सलग ४ षटकार मारून त्याने क्रीडारसिकांना मेजवानी दिली…डावखुरा फलंदाज जेव्हा हाय बॅट स्विंग ने खेळत असतो तेव्हा ती एक मेजवानी असते…आणि ती काल पुन्हा एकदा अभिषेक शर्मा याने दिली…किती सहज षटकार मारतो हा..जितका सहज लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळतो…तितकाच सहज कव्हर वरून.आणि तितकाच सहज मिड विकेट वरून पुल…काल सहा षटकात ७२ धावा लावल्यावर हैदराबाद संघाने आम्ही पाठलाग करणार याचे संकेत दिले…आणि पुढच्या रवी बिश्नोई याच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार मारून पाठलाग आम्हीच करणार यावर शिक्कामोर्तब केले…अभिषेक जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने सामना हैदराबाद संघाचा केला होता…कारण खाली क्लसन ईशान…नितीश..असे तगडे फलंदाज होते..त्याने ईशान सोबत वेगवान ८२ धावांची भागीदारी केली..आल्या आल्या ईशान याने कव्हर वरून मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. ईशान क्लसन आणि मेंडीस यांनी हैदराबाद संघाला विजयपथावर नेले..
काल प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाच्या सलामीवीरांनी ११५ धावांची मोठी सलामी देऊन आज लखनौ संघ मोठी धावसंख्या उभारेल याचे संकेत दिले…मिचेल मार्श आणि मकरम या दोघांनी आप आपले अर्धशतक पूर्ण करताना काही नयनरम्य फटके मारले…या दोघांनी जमिनी लगत आणि जमिनीवरून असे दोन्ही मार्ग अवलंबिले….दोघांनी बॅकफूट वरून काही फटके कव्हर सीमारेषेवर मारले..तर फिरकी गोलंदाजांना आकाश दाखविले…दोघांनी मिळून ८ षटकार मारून लखनौ संघाचा पाया मजबूत केला…पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पंत आज पुन्हा एकदा अपयशी ठरला…तो ज्या प्रकारे बाद झाला त्यावरून तो किती दुर्दैवी होता…त्याचा फॉलो थ्रू मध्ये पकडलेला झेल इतर कोणत्याही दिवशी गोलंदाजाने सोडला असता…पण काल पंत नशीबवान नव्हता….त्याचा पुरण आगोदर येण्याचा निर्णय फसला…लखनौ संघाने २०० धावा केल्या पण ते २०/२५ धावा अधिक करु शकले असते…पण त्यात ते अपयशी ठरले…निकोलस पुरण याने काल देखील आक्रमक खेळी केली पण ती अपुरी पडली…काल या षटकारांच्या बादशहाला पहिला षटकार मारण्यासाठी शेवटल्या षटकाची वाट पहावी लागली. लखनौ संघाच्या २०० धावांमध्ये ईशान किशन याचे खराब यष्टी रक्षण कारणीभूत होते..काल हर्ष दुबे याने त्याच्याकडून असलेल्या आशा उंचावल्या आहेत. आज लखनौ संघ अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर गेला ..यंदाची आय पी एल आता शेवटाकडे जात आहे..आणि अजून ही चौथ्या क्रमांकावर कोण असेल हे माहित नाही …दिल्ली… पंजाब. आणि मुंबई यांच्या आपापसातील लढती शिल्लक आहेत..आणि दावेदार सुद्धा तेच आहेत…बस कुछ दीन की बात है…
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.