उन्हाळ्यात Eiffel Tower ची उंची वाढते; पण कशी? वाचा सविस्तर…

पॅरिसच्या गुस्ताव आयफेल या इंजिनअरने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एका सुंदर टॉवरची बांधणी केली. या टॉवरला आयफेल टॉवर म्हणून ओळखल जातं. जगभारातून लाखो पर्यटक आवर्जून आयफेल टॉवरला भेट देतात. या टॉवरची उंची 324 मीटर एवढी आहे. मात्र, उन्हाळ्यात पॅरिसमधील आयफेल टॉवरची उंची वाढते.
उन्हाळ्यात हा टॉवर सुमारे 6 इंच किंवा 15 सेंटीमीटरने उंच होतो. उन्हाळ्यात या टॉवरचा आकार जसा वाढतो तसाच हिवाळ्यात त्याचा आकार कमी होतो. आयफेल टॉवर लोखंडापासून बनलेला आहे. अतिउष्णतेच्या संपर्कात आल्यावर धातूंचा विस्तार होतो. या प्रक्रियेला थर्मल एक्सपेंशन म्हणतात. जेव्हा जेव्हा तापमान वाढते तेव्हा घन, द्रव आणि वायुयुक्त पदार्थांचा विस्तार होतो. यामुळे, उन्हाळ्यात आयफेल टॉवरचा आकार वाढतो.
दरवर्षी लाखो लोक पॅरिसचा आयफेल टॉवर पाहण्यासाठी येतात. हा भव्य दिव्य Eiffel Tower बनवण्यासाठी सुमारे 800 दिवस लागले होते.या टॉवरमध्ये 18, 038 लोखंडी पार्ट्स आणि सुमारे 25 लाख खिळे आहेत.
Comments are closed.