ठरलं तर! 'या' मैदानावर रंगणार आयपीएल फायनलचा थरार…!

सध्या इंडियन प्रीमियर लीगचा 18वा हंगाम सुरू आहे. (Indian Premier League 2025) यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) (3 जून) रोजी आयपीएलच्या फायनल सामन्यासाठी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सऐवजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची (Narendra Modi Stadium) निवड केल्याचे वृत्त आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, ईडन गार्डन्समध्ये (25 मे) रोजी आयपीएल 2025 चा फायनल सामना होणार होता.

पण, भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा तणावामुळे स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित आयपीएल 2025च्या वेळापत्रकानुसार फायनल सामन्यासाठी 3 जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये क्वालिफायर 2 चे आयोजन होण्याची शक्यता आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, मंगळवारी (20 मे) बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिले 2 प्लेऑफ सामने नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळवले जाऊ शकतात. आयपीएल 2025 चा फायनल सामना कोलकात्याहून पूर्णपणे हलवण्याचे मुख्य कारण (3 जून) रोजी पावसाचा अंदाज होता.

Comments are closed.