यालाच म्हणतात खरे संस्कार! सामना संपताच वैभव सूर्यवंशीने केलं असं काही…VIDEO VIRAL
(IPL 2025) आयपीएल 2025 मध्ये मंगळवार, 20 मे रोजीचा सामना राजस्थान विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) हा सामना आरआरने 6 विकेट्स राखून सहज जिंकला. सीएसकेचा हा हंगामातील हा दहावा पराभव ठरला. दरम्यान, सामना संपताच, असे काही दिसले जे आजच्या काळात सहसा घडत (दिसत) नाही. राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने संधी मिळताच एमएस धोनीच्या पायाला स्पर्श (पाया पडले) केले. वैभवच्या या कृतीने त्याचे सर्वत्र काैतुक होत आहे.
सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला. सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा धोनी आणि वैभव समोरासमोर आले. धोनी जवळ येताच, वैभवने हस्तांदोलन करण्याऐवजी त्याचे पाय स्पर्श केले. (Vaibhav touches Dhoni’s feet) यानंतर धोनीने वैभवकडे पाहून पाठ थोपटली. वैभवनेही त्याचे निरागस हास्य दाखवले, हे असे दृश्य होते जे क्वचितच पाहायला मिळते.
पाहा व्हिडिओ-
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙩𝙤 𝙘𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 😊
हे काय आहे #Takelop सर्व काही आहे 💛🩷#Cskvrr | @Chennaipl | @रजस्थॅनरोयल्स pic.twitter.com/hi9ohchav1
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 20 मे, 2025
सामन्यानंतर वैबंध सूर्यावंशीने सुश्री धोनीच्या पायाला स्पर्श केला. ❤ pic.twitter.com/by54m5kgbe
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 20 मे, 2025
2011 मध्ये, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला हरवून एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्याच्या फक्त पाच दिवस आधी, म्हणजे 27 मार्च रोजी, वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला. तेव्हा कोणी विचार केला असेल की भारतासाठी तीन आयसीसी जेतेपदे जिंकणारा कर्णधार आणि वैभव सूर्यवंशी एकाच सामन्यात एकत्र खेळताना दिसतील. वैभवने ज्या पद्धतीने धोनीबद्दल आदर व्यक्त केला आहे त्यामुळे या लहान वयात त्याचे स्थान आणखी वाढले आहे.
Comments are closed.