सौदी अरबमध्ये जगातील पहिले एआय क्लिनिक

सौदी अरबने मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जगातील पहिले एआय आधारित क्लिनिक सुरू केले आहे. या ठिकाणी आलेल्या रुग्णांवर उपचार एआय आधारित डॉक्टर करणार आहे. हा अनोखा प्रोजेक्ट चीनची पंपनी सिनयी एआय आणि सौदीची अलमुसा हेल्थ ग्रुप यांच्या संयुक्तपणे सुरू करण्यात आला आहे. या पायलट प्रोजेक्टची सुरुवात गेल्या महिन्यात सौदीताल अल-अहसा येथून करण्यात आली आहे. या क्लिनिकला एआय डॉक्टर डॉ. हुआ चालवतात. हे डॉक्टर टॅबलेटद्वारे रुग्णांना रोगाच्या लक्षणांसोबत आवश्यक प्रश्न विचारले जातात. पह्टो आणि डेटाच्या मदतीने रोगाचे विश्लेषण केले जाते. या प्रक्रियेत खराखुरा डॉक्टर एआय डॉक्टरला सहायक मदतगार म्हणून मदत करतो. डॉ. हुआ यांनी तयार केलेल्या ट्रिटमेंट प्लानला अंतिम मंजुरी डॉक्टर देतात. आपत्कालीन स्थितीत खरे डॉक्टर घटनास्थळी उपस्थित राहतात. कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. सध्या हे एआय क्लिनिक श्वासोश्वाससंबंधी आजारावर उपचार करत आहे.
माणसांचाही सहभाग
आतापर्यंत एआय केवळ डॉक्टरांना मदत करत असत, परंतु आता एआय स्वतः रुग्णांचा उपचार करत आहे. एआय डॉक्टरांना मदत मिळावी म्हणून माणूस डॉक्टर सुरक्षा गेटकीपरची भूमिका साकारत आहे, असे सिनयी एआयने म्हटले आहे. एआयकडून करण्यात आलेला उपचार पूर्णपणे सुरक्षित आणि योग्य आहे. ज्या वेळी याची चाचणी करण्यात आली. त्या वेळी एआयमध्ये त्रुटी केवळ 0.3 टक्के होती, असे सिनयीचे सीईओ यांनी म्हटले. या टेक्नोलॉजीला टेनसेंट, हाँग शान कॅपिटल, जीजीव्ही कॅपिटल, सौदीच्या मदतीने तयार केले.
Comments are closed.