Transfers of 8 IAS officers in Maharashtra
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र दर महिन्यातून दोनदा किंवा तिनदा करताना दिसत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीनंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हता. असे असतानाच आज (21 मे) राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. राज्य सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र दर महिन्यातून दोनदा किंवा तिनदा करताना दिसत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीनंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हता. असे असतानाच आज (21 मे) राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सौरभ कटियार यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, तर नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers of 8 IAS officers in Maharashtra)
सी. के. डांगे (IAS 2010) यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार (IAS 2016) मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम (IAS 2008) यांची पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शीतल तेली-उगले (IAS 2009) यांची पुणे येथे क्रीडा आणि युवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – Congress : पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल जवानांचं अभिनंदन, पण शेतकरी आजही संकटात; सपकाळांची टीका
धुळ्याचे जिल्हाधिकारी जे.एस. पापळकर (IAS 2010) यांची छत्रपती संभाजी नगर विभागात विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिडकोचे मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विसपुते (IAS 2017) यांची धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील भूमी अभिलेख विभागातील अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक आनंद भंडारी (IAS 2017) यांची अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आशिष येरेकर (IAS 2018) यांची अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – Govind Pansare murder case : साक्षीदाराची साक्ष पूर्ण; न्यायालयात काय दिली माहिती?
Comments are closed.