Witness examination completed before bench in Comrade Govind Pansare murder case
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे 2015 मध्ये हत्या करण्यात आली होती. बाईकवरून आलेल्या दोन तरूणांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराची साक्ष 20 मे रोजी नोंदवली होती. यानंतर आज (21 मे) खंडपीठासमोर साक्षीदाराची साक्ष पूर्ण करण्यात आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी जून महिन्यात होणार आहे. (Witness examination completed before bench in Comrade Govind Pansare murder case)
पानसरे हत्येचा खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी साक्षीदाराची साक्ष नोंदवल्यानंतर आज साक्षीदाराची साक्ष पूर्ण करण्यात आली. वकील शिवाजीराव राणे यांनी खंडपीठासमोर सांगितले की, घटनेच्या दिवशी सकाळी साक्षीदार मुलांना शाळेत सोडण्यासाठी तयारी करत होता. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना चार ते पाच फटाके फुटल्यासारखा आवाज आला. त्यांनी घराबाहेर पाहिले असता साक्षीदाराला एक पुरुष आणि महिला रस्त्यावर कोसळल्याचे दिसले.
हेही वाचा – Devendra Fadnavis : बोगस बियाणं रोखण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; फडणवीसांनी दिली माहिती
साक्षीदाराने बंगल्याच्या बाहेर येऊन पाहिले असता त्यांना गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा हे गोळीबार झाल्यामुळे जखमी झाल्याचे दिसून आले. साक्षीदाराने आपल्या वडिलांना याची माहिती दिली आणि रुग्णवाहिका मागवली. या सर्व घटनेची माहिती फिर्यादी मुकुंद कदम आणि पानसरे कुटुंबीयांना दिली. तसेच त्यांनी खासगी वाहनांतून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. साक्षीदार हे पानसरे यांच्या घरापासून काही अंतरावरच राहतात आणि त्यांच्याच दारात हा प्रकार घडल्याची साक्ष त्यांनी खंडपीठासमोर दिली. या खटल्याची पुढील सुनावणी 11 जूनला होणार आहे. त्यावेळी साक्षीदाराचा उलटतपास होणार आहे.
काय आहे प्रकरण?
गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे या 16 फेब्रुवारी 2015 रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. सकाळी 9.15 वाजता त्यांच्या घराजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी वाचली.
हेही वाचा – Maharashtra Monsoon : हवामान खात्याने दिला हा इशारा, या तारखेला महाराष्ट्रात धडकणार मान्सून
Comments are closed.