Crores of rupees found in Gulmohar government rest house Thackeray Group leader Anil Gote exposes


धुळ्यातील शासकीय विश्रामगृह असलेल्या गुलमोहर येथील एका खोलीत कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याची मोठी बातमी उघडकीस आली आहे. शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

धुळे : जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह असलेल्या गुलमोहर येथील एका खोलीत कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याची मोठी बातमी उघडकीस आली आहे. गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटेंनी या खोलीच्या बाहेर ठिय्या मांडला होता. त्यामुळे या खोलीत ही रोकड कुठून आली? ती कोणाची आहे आणि यासंबंधित सर्व चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी आमदार गोटे यांच्याकडून करण्यात आली आहे. (Dhule News: Crores of rupees found in Gulmohar government rest house Thackeray Group leader Anil Gote exposes)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिस गोटे हे गुलमोहर हे शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले काही लोक आणि आणि एका मंत्र्याचा पीए पळून गेले. ज्यानंतर माजी आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुमला बाहेरून टाळे मारले आणि पहारा दिला. त्यानंतर रात्री 11 वाजता रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. रात्री प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर.पाटील, शिवसेना उबाठाचे नरेंद्र परदेशी, कॅमेरामन माळी या पाच लोकांच्या कमिटीने खोलीचे कुलूप तोडले. त्यानंतर तपासणी केली असता खोलीत नोटा सापडल्या. यामुळे नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले.

हेही वाचा… Crime : दोन लाखांची लाच घेताना सहकारी अधिकार्‍याला अटक; अंधेरीत एसीबीची कारवाई

या रोकड रक्कमेची मोजणी गुरुवारी (ता. 22 मे) पहाटे चार वाजता संपली. त्यानंतर पहाटे चार वाजता पोलिसांनी ती खोली सील केली. पण शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराने केलेल्या आरोपानुसार या खोलीत पाच कोटी नाही तर एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. त्यामुळे या प्रकरणी आता धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला आहे. या दौऱ्यात 11 आमदार सहभागी होणार आहेत. या समितीत आलेल्या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या 102 नंबरच्या खोलीत ठेवण्यात आले आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता.



Source link

Comments are closed.