Ajit Pawar first reaction to Vaishnavi Hagawane suicide case
वैष्णवी हगवणे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण आता अखेरीस अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर, कोणाच्या लग्नाला जाणे, ही माझी चूक आहे का? असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला आहे.
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी राजेंद्र हगवणे याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पण या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या लग्नसोहळ्यात अजित पवांराची उपस्थिती होती. त्यामुळे या प्रकरणात अजितदादा अजूनही का काही बोललेले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता अजित पवार एका कार्यक्रमाच्या माध्यमातून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलले असून या प्रकरणाचा माझ्याशी काय संबंध? माझ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने काही चूक केली, म्हणजे मी त्यांना ती चूक करायला सांगितली का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar first reaction to Vaishnavi Hagawane suicide case)
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या जाहीर मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमातून अजित पवारांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते या प्रकरणाबाबत म्हणाले की, तु्म्ही घरचे लोक आहात म्हणून मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलवता. शक्य असेल तेवढं मी यायचा प्रयत्न करतो, त्या भागात असेन तर उशिरा का होईना मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडवाकडं केले, त्रास दिला तर तिथे माझा काय संबंध आहे? मी त्यांना सांगितले का असे कर म्हणून? मला तर काही कळतच नाही. ही घटना घडल्या घडल्या मी पिंपरी-चिंचवडच्या सीपींना म्हटले की, कोणी का असेना ॲक्शन घे, अशी माहिती अजित पवारांकडून देण्यात आली.
तसेच, मला कळताच मी पोलिसांना कारवाई करायला सांगितली. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठे? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलावतात तिथे जावे लागते, नाही गेले तर माणसे रूसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सूनेशी असे वागा म्हणून, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
तर, अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात. मग माझी बदनामी का करता? पण आता या प्रकऱणी गुन्हा नोंद झाला आहे. सीपींना सांगितले कारवाई झाली पाहीजे. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून, जबाबदारी म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असे म्हणत अजित पवारांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.