Kitchen Tips : केळी काळी पडू नयेत यासाठी सोप्या टिप्स

केळी हे सर्व हंगामात उपलब्ध असणारे फळ आहे. लोह आणि कॅल्शियम व्यतिरिक्त, दररोज व्हिटॅमिन ए आणि बी यांनी समृद्ध असलेली केळी खाण्याचा सल्ला दिला जातो . पण वातावरणातील काही घटकांमुळे , वायूमुळे केळ्यांचा रंग प्रथम तपकिरी आणि नंतर काळा होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत केळी खावीशी वाटत नाही. त्यांना कशाप्रकारे साठवून ठेवायला हवे जेणेकरून ती टिकून राहतील हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात. या टिप्सद्वारे तुम्ही दीर्घकाळ ताज्या आणि चविष्ट केळींचा आनंद घेऊ शकाल.

केळी बहुतेकदा पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅक केली जातात, मात्र ती खरेदी केल्यानंतर काही वेळातच काळी पडू लागतात. यासाठीच तुम्हाला सर्वात आधी त्याचे पॅक काढावे लागेल. जर ही केळी पिशवीत तशीच ठेवून दिली तर त्यांचा पिकण्याचा वेग वाढतो कारण पिशवीत इथिलीन वायू जमा होतो.

घड लटकत ठेवा
केळीचा घड कुठेतरी लटकवून ठेवा. यामुळे ते जमिनीवर पडून राहणार नाहीत आणि उष्णतेमुळे लवकर पिकणार नाहीत. त्यामुळे त्यांना तपकिरी डाग पडणार नाहीत.

देठाला प्लास्टिक गुंडाळा
केळीच्या देठापासून किंवा वरच्या भागातून इथिलीन वायू बाहेर पडतो, जिथे केळीचे घड एकमेकांना जोडलेले असतात. तो भाग प्लास्टिकने गुंडाळल्याने केळी पिकण्याची गती मंदावते.

सूर्य आणि उष्णतेपासून संरक्षण करा
थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे केळी लवकर पिकू लागतात. केळी नेहमी थंड, अंधाराच्या ठिकाणी ठेवावीत.

इतर फळे आणि भाज्यांपासून दूर ठेवा
केळी हे एकमेव फळ नाही जे पिकल्यावर इथिलीन वायू सोडते. सफरचंद, नासपती, बटाटे, एवोकॅडो ही काही फळे आणि भाज्या देखील आहेत जी इथिलीन वायू उत्सर्जित करत असतात. तुम्ही या फळांपासून केळींना दूर ठेवावे.

केळी पिकल्यानंतर ती अशी साठवावी
केळी पिकेपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य नाही, परंतु एकदा पिकले की ती बाहेर ठेवता येत नाहीत. केळी पिकल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ती एक ते दोन आठवडे खराब होत नाहीत.

हेही वाचा : पनीर हैदराबादी: पनीर हैदराबादी


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.