भारतीय कसोटी संघात आम्हाला त्या दोन्ही दिग्गज खेळाडूंची कमी भासणार आहे! – अजित आगरकर
इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी (test series IND vs ENG) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता शुबमन गिलला (shubman gill) कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी काही प्रश्नांची चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली. जेव्हा विराट (Virat Kohli) आणि रोहितच्या (Rohit Sharma) निवृत्ती बद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी गौतम गंभीर (Gautam gambhir) यांचे म्हणणे मान्य करत म्हटले निवृत्ती घेणे हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.
एवढेच नाही तर अजित आगरकर यांनी टीम इंडियाच्या (team india) या दोन्ही दिगजांचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “ ते कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी मोठे खेळाडू होते. संघात त्यांची जागा घेणे खूप मोठी गोष्ट आहे.
आगरकर यांनी कोहलीच्या निवृत्तीवर चर्चा करताना म्हटले की, माजी भारतीय कर्णधार विराटने मागच्या एप्रिल महिन्यात आमच्याशी संपर्क केला होता. त्यादरम्यान विराट म्हणाला होता की, मी कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. तेव्हा मुख्य निवडकर्त्यांनी त्यांचे म्हणणे मांडत तसेच कोहलीच्या निर्णयाचा सन्मान करत म्हटले होते.
जेव्हा असे खेळाडू निवृत्ती घेतात तेव्हा, एक मोठी कमी भरून काढणे गरजेचे असते. अश्विनने सुद्धा काही दिवसांपूर्वी निवृत्ती घेतली, हे तीनही खेळाडू टीम इंडियाचे दिग्गज होते.
पुढे बोलताना आगरकर म्हणाले, मी त्या दोघांशी सुद्धा बोललो होतो. तसेच ते देखील म्हणाले, कदाचित त्यांनी निवृत्ती घेण्याची हीच वेळ होती. जेव्हा त्यांनी निर्णय घेतलाच आहे तर आम्हाला त्यांच्या निर्णयाचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्या दोघांनीही तो सन्मान कमावलेला आहे. आम्हाला त्या दोन्ही दिग्गज खेळाडूंची कमी भासणार आहे. कोहली असा खेळाडू होता ज्याने 123 कसोटी सामन्यात 30 शतक झळकावले.
Comments are closed.