जसप्रीत बुमराहकडे कसोटी संघाचे कर्णधारपद का सोपवण्यात आले नाही? मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले कारण

भारतीय संघाचा (Team india) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून (test cricket retirement) निवृत्ती जाहीर केली. यानंतर बोर्ड नव्या कर्णधाराच्या शोधात होता. कर्णधार कोण असणार या यादीमध्ये शुबमन गिल (Shubman gill) , रिषभ पंत‌ (Rishbh Pant) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) या खेळाडूंची नावे सामील होती. आता प्रतीक्षेनंतर संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शुबमन गिलकडे (Shubman gill Captain of indian test cricket team) कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. याचबरोबर रिषभ पंतला उपकर्णधार (Rishbh Pant vice captain of indian test cricket team) करण्यात आले आहे. लीडरशिप भूमिकेत जसप्रीत बुमराहचं नाव कुठेच दिसलं नाही. याचं कारण मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा केली तेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना प्रश्न विचारण्यात आला की, बुमराहकडे कर्णधार पद का सोपवण्यात आले नाही? तेव्हा उत्तर देताना ते म्हणाले मला वाटत नाही की, सर्व 5 सामन्यांसाठी जसप्रीत उपलब्ध असेल. जर त्याने तीन किंवा 4 कसोटी सामने जरी खेळले तरी आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरेल. मी या गोष्टीनेच आनंदी आहे की, तो संघाचा भाग आहे. याच गोष्टीने स्पष्ट होते बुमराह (jaspreet bumrah) त्याचा फिटनेसच्या कारणाने कर्णधार (captaincy) पद घेऊ शकला नाही.

भारतीय संघाने (team india) त्यांची शेवटची कसोटी मालिका (test series) ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) खेळली होती. जिथे जसप्रीत संघाचा कर्णधार होता. जिथे पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. तेव्हा जसप्रीतने कर्णधार पद सुद्धा भूषवले होते. ज्यामध्ये टीम इंडियाने एक सामना जिंकला होता आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खराब फिटनेसच्या कारणाने बुमराह शेवटचा सामना पूर्ण खेळू शकला नाही. याच कारणाने जसप्रीतकडे कर्णधार पद सोपवण्यात आले नाही. टीम इंडिया आता त्याला गोलंदाज म्हणून खेळवणार आहे.

Comments are closed.