महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, रोहित पवारांची रुपाली चाकणकरांवर टीका

महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी ही टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, प्रशासनाने वेगळं नियोजन करून महिन्यांच्या अडचणी सोडवायला हव्यात.

रोहित पवार म्हणाले आहेत की, “ज्या पद्धतीने महिला आयोगाने काम करायला हवं, तसं काम होताना दिसत नाही. प्रशासनाने यात वेगळ्या प्रकारचे आयोजन आणि नियोजन केले पाहिजे. ज्यात महिलांना स्वतःहून पुढाकार घ्यावासा वाटेल आणि तिथे त्यांच्या अडचणी सुटतील. महिला अत्याचाराचे प्रकरणे महाराष्ट्रात वाढले आहेत. त्यामुळे थातूर माथूर उत्तर न देताना महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार करायला हवा.”

Comments are closed.