पहिल्या कसोटी सामन्यात 'या' 11 खेळाडूंवर मोठी जबाबदारी, पण स्टार खेळाडूला संधी नाही!
टीम इंडिया (Team india) 18 वर्षानंतर इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर कसोटी मालिकेत (Test Series) पराभूत करण्याची तयारी करत आहे. यासाठी टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये जाऊन तयारी करत आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे, जिथे भारतीय संघ सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हन (playing Elevan) सोबत मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हन मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
भारतीय संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये के एल राहुल (Kl Rahul) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal) संधी देणार आहे. पण 3 नंबरवर करूण नायरला (Karun Nair) देखील संधी मिळू शकते. कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) 4 नंबरवर तसेच यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) पाचव्या स्थानावर खेळू शकतो. याशिवाय जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), मोहम्मद सिराज (mohmmad Siraj), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), प्रसिद्ध कृष्णा (Prasiddha krishna) यांना देखील संधी मिळू शकते. साई सुदर्शन (Sai surdarshan) आणि अभिमन्यू ईश्वरण (Abhimnyu Ishwarn) मधील एकाला संधी दिली जाऊ शकते.
तसेच शार्दुल ठाकूर (Shardul thakur) आणि नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) मधील देखील कोणताही एक फलंदाज खेळू शकतो. अशा परिस्थितीत स्टार गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर राहू शकतो.
Comments are closed.