WMPL 2025: स्मृती मंधानाचे अर्धशतक वाया! पुणे वाॅरियर्सचा रत्नागिरी जेट्सवर शानदार विजय

रत्नागीरी जेट्स वि पुणे वॉरियर्स: वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग WMPL 2025 स्पर्धेत पुणे वाॅरियर्सने रत्नागिरी जेट्सवर 5 धावांनी विजय मिळवला. पुणे वाॅरियर्सने रत्नागिरी जेट्सला 152 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात रत्नागरी जेट्सची कर्णधार स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) शानदार अर्धशतक झळकावले पण तिचे अर्धशतक वाया गेले. तर दुसरीकडे पुणे वाॅरियर्सची खुशी मुल्लाने संघासाठी दमदार अर्धशतक झळकावले. तिने 54 चेडूत 68 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान तिने आपल्या खेळीत 8 चौकारांसह 1 षटकार ठोकला. तिच्या या दमदार अर्धशतकासाठी तिला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आलं.

पुणे वाॅरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 151/8 अशी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये खुशी मुल्लाने सर्वाधिक 68 (54) धावा केल्या, तर कर्णधार अनुजा पाटीलने 27 (22) धावांची खेळी केली. रत्नागिरी जेट्सकडून संजना वाघमोडे आणि प्रियांका घोडकेने सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रत्नागिरी जेट्सची सुरूवात खराब झाली. संघाने 10 या धावसंख्येवर पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर संघाच्या विकेट्स पडतच राहिल्या. नंतर कर्णधार स्मृती मंधानाने डाव सावरत एक बाजू लढवली. तिने 34 चेंडूत 61 धावांची दमदार खेळी केली. पण ती आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. चिन्मयी बोरपलेने महत्वाच्या वेळी मंधानाची विकेट घेत तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इथेच सामना फिरला.

पुणे वाॅरियर्ससाठी चिन्मयी बोरपलेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार अनुजा पाटीलने 2 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. (Pune Warriors beat Ratnagiri Jets by 6 runs)

पुणे वाॅरियर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स

पुणे वाॅरियर्स 151/8 (20 षटके)
खुशी मुल्ला 68 (54)
अनुजा पाटील 27 (22)

रत्नागीरी जेट्स
प्रियांका घोडके 2/32 (4 षटके)
संजना वाघमोडे 2/17(3 षटके)

रत्नागिरी जेट्स (20 षटके)
स्मृती मंदाना 61 (34)
प्रियांका घोडके 25 (37)

पुणे वाॅरियर्स
चिन्मयी बोरपले 3/23 (4 षटके)
अनुजा पाटील 2/30 (4 षटके)

पुणे वाॅरियर्सचा 5 धावांनी शानदार विजय

Comments are closed.