साखरपुड्याची अंगठी घालताच खासदार प्रिया सरोज नाचल्या; रिंकू सिंह पाहतच बसला, VIDEO
रिंकू सिंह-प्रिया सारोज: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंह (Riku Singh) आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांचा काल (8 जून) साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली. साखरपुड्याची अंगठी घालताच प्रिया सरोज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, रिंकू आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहे. यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला. मात्र होणाऱ्या पत्नीला नाचताना रिंकू सिंह पाहतच बसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जेव्हा एखाद्या अंतर्मुखीने एक्सट्रॉव्हर्टशी लग्न केले pic.twitter.com/k6wey2dm1l
– सागर (@सागरकॅसम) 8 जून, 2025
विवाह सोहळा 18 नोव्हेंबरला-
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव, डिंपल यादव, शिवपाल यादव, राजीव शुक्ला, जया बच्चन, क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पियूष चावला यांच्यासह इतर उपस्थित होते. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी साखरपुड्यापूर्वी कुटुंबासह बुलंदशहरच्या चौधेरा येथील विचित्र देवी मंदिरात आशीर्वाद घेतला. त्यांनतर फुलकर्न हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह सोहळा 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये होणार आहे.
रिंकू सिंह समाजवादी पार्टीचे खासदार पिर्या सारोज यांच्याशी व्यस्त आहेत. ❤
– त्यांचे अनेक अभिनंदन! 👏 pic.twitter.com/kbiiyzigsk
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 8 जून, 2025
प्रिया सरोज देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार-
प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे. गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत. दरम्यान, प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तुफानी सरोज 1999, 2004, 2009 मध्ये खासदार होते.
रिंकू सिंहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
रिंकू सिंह प्रामुख्याने भारतासाठी टी-20 क्रिकेट खेळतो. दरम्यान रिंकूने एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. आतापर्यंत रिंकूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूने एकदिवसीय सामन्याच्या 2 डावात 55 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 38 धावा होती. याशिवाय, 22 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये, रिंकूने 46.09 च्या सरासरीने आणि 165.14 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. रिंकून 3 अर्धशतक झळकावली आहे. ज्यात सर्वाधिक धावसंख्या 69* धावा आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
Rinku Singh Wedding: रिंकू सिंह खासदार प्रिया सरोजसोबत लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् ठिकाणही आलं समोर
आणखी वाचा
Comments are closed.