कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांचा पत्रकारावर हल्ला

कॅनडामध्ये आज खलिस्तानी समर्थकांनी पत्रकारावर हल्ला केल्याची घटना घडली. मोचा बेझिरगन असे या पत्रकाराचे नाव आहे. हल्लेखोरांपैकी एकजण गेल्या वर्षभरापासून त्यांचा पाठलाग करत होता, असे मोचा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हल्लेखोर ब्रिटिश नागरिक असून तो बऱ्याच काळापासून आपल्याला त्रास देत होता तसेच आपल्याविरोधात अपशब्दही वापरत होता असा आरोपही मोचा यांनी केला आहे. दरम्यान, मोचा हे गेल्या वर्षभरपासून कॅनडा, अमेरिका, ब्रिटन तसेच न्यूझीलंडमध्ये खलिस्तानी निदर्शनांचे वार्तांकन करत होते.
Comments are closed.