Chandrahar Patil will leave Uddhav Thackeray’s party and join Eknath Shinde’s Shiv Sena party
काही दिवसांपूर्वीच सांगलीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या मागील कारणही सांगितले आहे.
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीआधीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सांगलीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. मात्र त्यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले होते की, मी अधिकृत भूमिका घेतली नसून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेणार आहे. मात्र आता त्यांनी सरकारसोबत जाण्याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (Chandrahar Patil will leave Uddhav Thackeray’s party and join मराठी’s Shiv Sena party)
चंद्रहार पाटील यांनी फेसबुकला एक पोस्ट पोस्ट केला आहे. यात त्यांनी म्हटले की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी, अडचणी आणि गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. त्यामुळे आता क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का बसला आहे.
हेही वाचा – Politics : ठाकरे ब्रँड आमच्याकडे, उद्धव ठाकरेंकडे फक्त…; शिंदे गटाच्या नेत्याची टीका
चंद्रहार पाटील शिवसेनेत करणार पक्षप्रवेश
सांगलीच्या भाळवणीमध्ये 30 मे ला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा भेट म्हणून देण्यात आली होती. तेव्हापासूनच चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली होती. यानंतर चारच दिवसांपूर्वी (04 जून) शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे 9 जून रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर हा प्रवेश थांबवा, असे आव्हानच संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिले होते.
हेही वाचा – Bacchu Kadu : मी मेलो तरी सरकारला फरक पडणार नाही; अन्नत्याग आंदोलनावेळी बच्चू कडूंनी सांगितलं कारण
Comments are closed.