पुष्पक एक्स्प्रेस नव्हे, कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनमधून प्रवाशी खाली पडले, बॅगमुळे घटना, मोठी अप

मुंबई ट्रेन अपघात: मध्य रेल्वेमार्गावर (Mumbai Train Accident) आज (सोमवारी 9 जून) सकाळी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कसाऱ्याच्या दिशेने जात असताना 5 प्रवासी रेल्वेमधून खाली ट्रॅकवर पडले. ही घटना घडल्यानंतर या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले, या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत, दरम्यान या अपघाताबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माहिती दिली आहे.  या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बॅगमुळे हा अपघात झाल्याची माहिती

या दोन्ही लोकल ट्रेन होत्या. त्या लोकल एकमेकांपासून विरूध्द दिशेला जात होत्या. फुटबोर्डावरती हे सर्वजण प्रवास करत होते, बॅगमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्यामुळे ते रेल्वेमधून खाली पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी माहिती दिली आहे. लोकलमधून लटकलेले प्रवासी शेजारून जाणाऱ्या ट्रेनमधील बॅगला घासले गेल्याने दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

दिवा ते मुंब्रा दरम्यान एकमेकांना बॅगा लागल्याने पाच जण पडले. एका प्रवाशाने माहिती दिली आहे, की दोन ट्रेनमधले लोकांना बॅग लागल्याने हे पडलेत. आॅटोमॅटिक डोअर सोबतच्या गाड्या येणार आहेत. 8 लोकं ट्रॅकवर पडली आहेत. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे, कसारा लोकल आणि एक्स्प्रेस शेजारून जात असताना दुर्घटना झाल्याची माहिती आहे. मुंब्रा स्थानकजवळ सगळा प्रकार घडला आहे. एकूण 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शासकिय कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5 ते 6 जण ट्रॅकवर पडले. 2 जण ट्रॅकच्या बाजूला पडले होते. प्रवासी फुटबोर्डावर प्रवास करत होते. दोन्ही गाड्या लोकल होत्या. त्या एकमेकांच्या विरोधी जात होत्या. या घटनेच जो जखमी झाला आहे त्या प्रवाशाने सांगितलं  जे नेमकं घडलं आहे ते सांगितलं. दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर असतं. मात्र, त्यांच्या बॅगा मागे होत्या, अशात धक्का लागला आहे असं प्रवाशाचे म्हणणं आहे

अपघाताचे काही व्हिडीओ समोर

सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या  व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही.

https://www.youtube.com/watch?v=7jm-sf6l20m

आणखी वाचा

Comments are closed.