गिल-जयस्वालसोबत टीम इंडियाचा तिसरा भविष्यातील स्टार कोण? रॉबिन उथप्पाच्या वक्तव्याने खळबळ!
माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पानुसार (former cricketer robin uthappa) डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन (Sai surdarshan) भविष्यातील गिल (shubman gill) आणि यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) यांच्यासोबत भविष्यातील तिसरा स्टार खेळाडू ठरू शकतो. सुदर्शनने आताच आयपीएल 2025 मध्ये शानदार कामगिरी केली, त्याने 15 डावांमध्ये 54.21 च्या सरासरीने 759 धावा केल्या, ज्यामध्ये गुजरातसाठी त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली. या डाव्या हाताच्या फलंदाजाने भारतासाठी तीन वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे आणि 20 जून पासून सुरू होणाऱ्या इंग्लंडच्या पाच मालिकेच्या दौऱ्यावर तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
एक नाव जे लगेच लक्षात येतं ते आहे साई सुदर्शन. मागच्या काही वर्षात त्याने खूप शानदार कामगिरी केली आहे. मागच्या वर्षीच त्याला जास्त धावा न करण्याच्या कारणाने सामन्यात रिटायर्ड आऊट करण्यात आले होते. तसेच यावर्षी त्याने त्याच्या खेळीने आणि आत्मविश्वासाने अशा वेगवान धावा केल्या की त्याचा स्ट्राइक रेट 130 पासून 170 झाला आणि आता त्याने ऑरेंज कॅप सुद्धा पटकावली आहे. हे खूप प्रभावशाली आहे.
मला खरेच वाटते की, तो भारताच्या भविष्यामध्ये तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये एक ठरू शकतो. शुबमन गिल (Shubman gill), यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) अशा खेळाडूंसोबत तो सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. तुमच्याकडे प्रियांश आर्य (priyansh aarya), प्रभसिमरन सिंग (Prabhsimran singh) सारखे खेळाडू आहेत आणि अजून काही खेळाडू देखील पुढे जात आहेत. ऑस्ट्रेलिया समर ऑफ क्रिकेट 2025/ 26 उद्घाटनाच्या वेळी उथप्पाने म्हटले, आता हे खेळाडू अत्यंत विश्वास आणि मेहनतीने खेळत आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की, ते खूप सहज मागे पडतील.
Comments are closed.