देशाच्या लोकसंख्येपेक्षा सायकलींची संख्या अधिक

जगभरात अनेक प्रकारची अत्याधुनिक वाहने आहेत, पण असे असले तरी सायकलीचे वेड काही कमी नाही. नेदरलँड हा देश सायकल चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे सायकलींची संख्या त्या देशाच्या लोकसंख्येहून अधिक आहे. नेदरलँडमध्ये 1.7 कोटी लोक राहतात, तर तिथे सायकलींची संख्या 2.7 कोटी आहे. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी 1.3 पेक्षा अधिक सायकल आहे. नागरिकांना सायकल नीट चालवता यावी या हिशेबाने रस्ते तयार करण्यात आले. तिथला नागरिक वर्षाला एक किलोमीटर एवढी सायकल चालवतो.

Comments are closed.