पुल कोसळताना चार पर्यटक मरतात

पुणे जिल्ह्यातील घटना : इंद्रायणीत अनेक जण वाहून गेल्याची भीती, 18 जण जखमी, 38 जणांचा वाचवण्यात यश

प्रतिनिधी / लोणावळा, पिंपरी, पुणे

दरवषी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक तळेगाव येथील कुंडमळा येथे भेट देतात. दररोज प्रमाणेच रविवारीही (15 जून) शेकडो नागरिक कुंड मळा येथे पर्यटनासाठी आले होते. गेले काही दिवस सातत्याने पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा एक पूल आहे. हा पूल किमान 40 त 50 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी हा पूल संपूर्णपणे लोखंडी ढाच्याचा होता. गेल्या काही वर्षात पुलाच्या दोन्ही बाजूचा काही भागाचे सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पुलाचा मध्यभाग हा लोखंडीच होता. पर्यटनाला आलेल्या काही नागरिकांनी आपल्या दुचाकी या पुलावर घातल्या. तर काही पर्यटक पुलावर उभे होते. क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने अचानक पुलाचा मोठा आवाज झाला आणि हा लोखंडी पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर पुलावरील सर्व पर्यटक आणि त्यांच्या दुचाकी नदीच्या प्रवाहात पडले. काही पर्यटक लोखंडी पुलाच्या साच्याखाली अडकले. त्यामुळे त्यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर काही पर्यटक पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुलावर एकाच वेळी 100 पर्यटक?

प्रशासकीय यंत्रणेकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अंदाजे 100 पर्यटक या पुलावर होते. सदर दुर्घटनेमधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना ऊग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1) पवना ऊग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल आदी ऊग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड  आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्मयू पथक व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे.

पुलाचा सांगाडा उचलताना अडथळे

या दुर्घटनेत लोखंडी पुलाचा संपूर्ण सांगाडा नदीत कोसळला. पुलावर दुचाकी तसेच चालत असणारे अनेक पर्यटक नदीत कोसळले. काही पर्यटक या पुलाच्या सांगड्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर प्रशासनाने चार मोठ्या व्रेन बोलावून सांगाडा काढण्याचा प्रयत्न चालवला. मात्र, नदीचे पाणी, पात्रातील खडक आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते.

नातवाईकांचा आक्रोश….

कुंडमळा येथे वर्षा सहलीसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब आले होते. यातील अनेक नागरिक आपली पत्नी, मुलांना चांगला निसर्ग दाखविण्यासाठी दुचाकीवर घेऊन नदीच्या पुलावर गेले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक फोटो काढत होते. त्यातच अचानक पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. पूल कोसळल्याचे पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. माझा मुलगा, सून, नातू पुलावर होते. ते खाली पडले आहेत. अजून सापडले नाहीत, त्यांना वाचवा, त्यांना शोधा, अशी आर्त हाक नातेवाईक देत होते.

बचावकार्य सुरू, महाजनांसह अनेक नेत्यांची घटनास्थळी धाव

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच मदत व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन,  मावळ तालुक्मयाचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे नेते रवींद्र भेगडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, रघुवीर शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल घेतली व मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. दुर्घटना घडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक व परिसरातील नागरिकदेखील दाखल झाले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिणामी मदत कार्यास काहीसा अडथळा निर्माण होत होता. त्यातच पावसाच्या सरीही सुरू होत्या. त्यानंतर अंधारही पडला. मात्र, बचाव कार्य सुरूच ठेवण्यात आले होते.

Comments are closed.