Devendra Fadnavis gave information about the bridge accident on Indrayani river in Pune
पुण्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध कुंडमळा या पर्यटनस्थळी असलेल्या इंद्रायणी नदीवर पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूल दुर्घटनेबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
पुणे : तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध कुंडमळा या पर्यटनस्थळी असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळल्यानंतर 30 हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पूल कोसळल्यानंतर पोलीस, एनडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू केलं आहे. अशातच आता पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत माहिती दिली आहे. (Devendra Fadnavis gave information about the bridge accident on Indrayani river in Pune)
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले आहे. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे म्हणत फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
हेही वाचा – Ajit Pawar : पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी, अफवांवर विश्वास ठेवू नका; अजित पवारांचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
सदर दुर्घटनेबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. या दुर्घटनेत 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा – Politics : काही लोकांनी रुमाल वेटरसारखा खांद्यावर टाकला; भरत गोगावलेंनी तटकरेंची उडवली खिल्ली
Comments are closed.