MHT CET PCM exam 2025 results have been declared and 22 students have passed with 100 percent marks
नॅशलन टेस्टींग एजन्सीने (NTA) वैद्यकीय पदवीसाठी घेतलेल्या NEET UG 2025 चा निकाल दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता. यानंतर आज (16 जून) महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत
मुंबई : नॅशलन टेस्टींग एजन्सीने (NTA) वैद्यकीय पदवीसाठी घेतलेल्या NEET UG 2025 चा निकाल दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता. यानंतर आज (16 जून) महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षेला बसलेले विद्यार्थी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइट आपला निकाल पाहू शकतात. (MHT CET PCM exam 2025 results have been declared and 22 students have passed with 100 percent marks)
नॅशलन टेस्टींग एजन्सीने (NTA) 9 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान PCB गट परीक्षा घेतली. त्याचवेळी, एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) गट परीक्षा 19 एप्रिल 2025 ते 05 मे 2025 दरम्यान घेण्यात आली होती. 4,64,263 उमेदवारांपैकी 4,22,863 उमेदवारांनी एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा दिली होती. या उमेदवारांनी पीसीएम उत्तर पत्रिकेवर एकूण 40 आक्षेप दाखल केले होते. ते लक्षात घेऊन, परीक्षेचा अंतिम निकाल आज दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थी 100 गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षेला बसलेले विद्यार्थी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर MHT CET PCM 2025 चा निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल. तर या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील प्रवेशाची तयारी करता येणार आहे.
हेही वाचा – Harshwardhan Sapkal : संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी सपकाळांची मागणी
एमएचटी सीईटी पीसीएम 2025 निकाल कसा तपासावा?
- एमएचटी सीईटी पीसीएम निकाल 2025 तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- यानंतर होम पेजवरील MHT-CET 2025 निकाल पीसीएम ग्रुप निकालावर क्लिक करा.
- तुम्ही एका नवीन पेजवर गेल्यावर तिथे तुम्हाला लॉगिन तपशील भरावे लागतील. या वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरा.
- तुमच्या स्क्रीनवर MHT-CET 2025 निकालाची लिंक उघडेल.
- तेथून MHT CET निकाल 2025 डाउनलोड करा किंवा तुम्ही निकालाची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.
एमएचटी सीईटी पीसीबी 2025 चा निकाल कधी?
या वर्षी एमएचटी सीईटी पीसीबी गट परीक्षेसाठी एकूण 3,01,072 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,82,737 उमेदवार परीक्षेला बसले होते. एमएचटी सीईटी पीसीबी गटाची तात्पुरती उत्तर पत्रिका 18 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नवीन अपडेटनुसार, एमएचटी सीईटी पीसीबी गटाचा निकाल 17 जून 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीस – ठाकरेंच्या भेटीवेळी मुंबईतले बिल्डरही उपस्थित, राऊतांच्या दाव्याने खळबळ
Comments are closed.