सचिन तेंडुलकर की विराट कोहली अँडरसनच्या मते कोण आहे सर्वात घातक फलंदाज?

जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक मानला जाणाऱ्या जेम्स अँडरसनने (James Anderson) विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यातील घातक फलंदाजापैकी भाष्य केले आहे. ज्याच्या विरुद्ध गोलंदाजी करणे त्याला अवघड जात होते. अँडरसनने टॉल्क स्पोर्ट्स सोबत बातचीत करताना म्हटले आहे की, मला विराट विरुद्ध गोलंदाजी करणे खूप अवघड जात होते कारण त्याची मानसिकता सुद्धा मजबूत होती. तसेच तो लढाई असल्यासारखा खेळायचा आणि तो एक चांगला प्रतिस्पर्धी होता. तसेच तो खूप वेगळा आहे.

विराट त्याच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायचा आणि जेव्हा तो विकेट पडल्यानंतर ज्या पद्धतीने आनंद साजरा करतो, असं वाटतं की ती विकेट त्यानेच घेतली आहे. तो या प्रकारच्या गोष्टी करायचा की ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसायचं, त्यामुळे मी मला जितकं होईल तितका प्रयत्न केला की मी त्याला बाद करेन आणि त्याला खेळण्यातून बाहेर करेल. मी जेव्हा त्याला गोलंदाजी करायचो तेव्हा त्याला फक्त उजव्या हाताचा फलंदाज म्हणून कल्पना करायचो आणि त्याच्याबद्दल जास्त विचार करत नव्हतो.

अँडरसनने कोहली विषयी म्हटले, ज्या प्रकारे विराटचं करिअर पुढे वाढत गेलं, त्याच्यासाठी सुद्धा या प्रकारच्या गोष्टी घडत गेल्या.

सचिन बद्दल बोलताना अँडरसनने म्हटले, तो देवासारखा आहे आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही भारतामध्ये त्यांच्याविरुद्ध खेळता तेव्हा भारतात त्याचं कशाप्रकारे स्वागत होतं. प्रशंसक सचिन सोबत कसा व्यवहार आणि त्याचा सन्मान करतात हे बघणं अविश्वसनीय होतं.

सचिन तेंडुलकर विराटपेक्षा खूप वेगळा होता. सचिन खेळपट्टीवर खूप शांत आणि सौम्य असायचा आणि तो जेव्हा फलंदाजी करायला यायचा तेव्हा ते त्याच्या करिअरमध्ये एका वेगळ्याच स्वरूपात असायचा. जेव्हा मी त्यांचा विरुद्ध खेळलो होतो, तेव्हा तो मला देवासारखा वाटायचा. भारतात लोक त्यांना देवाप्रमाणे मानतात. तसेच सचिनने एवढा सन्मान मिळवल्यानंतर देखील तो खूप समजूतदार आणि शांत आहे. तसेच मला त्याला बाद करण्यात जास्त आनंद व्हायचा.

Comments are closed.