Sanjay Raut scathing criticism of Shiv Sena Shinde group and Amit Shah
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 17 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी शिंदेंची शिवसेना पक्ष नसून तो गट असल्याची टीका केली आहे.
मुंबई : राज्यभरात गुरुवारी (ता. 19 जून) शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. पण आता दोन शिवसेना असल्याने या दोन्ही शिवसेनेकडून हा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. याचबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्ष नसून तो गट असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे. निवडणूक आयोगावर दबाव आणून तो गट तयार करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बसून हा गट तयार केल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसेच, त्यांनी जोरदार निशाणा सुद्धा अमित शहांवर साधला आहे. (Sanjay Raut scathing criticism of Shiv Sena Shinde group and Amit Shah)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 17 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, शिंदे यांचा शिवसेना पक्ष नसून तो गट आहे. त्या गटाचे अध्यक्ष अमित शहा आहेत. निवडणूक आयोगावर दबाव टाकून अमित शहा यांनी हा गट स्थापन केला. महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी त्यांनी हा गट स्थापन केला. त्याला शिंदे बळी पडले. त्यांचा एक गट आहे. भ्रष्टाचारातून आलेला प्रंचड बेहिशोबी पैसा आहे. एमएमआरडीएच्या कंत्राटात 3 हजार कोटींचा घोटाळा सर्वोच्च न्यायालयानेच उघड केला आहे. एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी याप्रमाणे महिन्याला एमएमआरडीएची 119 मोठी टेंडर निघतात. किती कोटींचा व्यवहार असतो. त्यातून मिळालेले पैसे राजकारणात आणतात. आमदार, खासदार विकत घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी त्याचा वापर करतात, असा आरोप राऊतांनी केला आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : अडचण असणाऱ्यांना पक्षानेच केले दूर, बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावर राऊतांचा टोला
तसेच, अमित शहा जे करतात, ती पैशांची आणि सत्तेची ताकद आहे. आमची ताकद ही प्रामणिकपणा आणि निष्ठा आहे. त्यामुळे शिवसेनेचा वर्धापनदिनाचा मेळावा हा जोरात आणि जोशात होणार आहे. तसेच हा मोळावा विशेष असणार आहे, जो षण्मुखानंद येथे होणार आहे. असे यावेळी खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. अशा परिस्थितीतही शिंदे आणि भाजपा घोसाळकर यांच्या कुटुंबावर दबाव टाकत आहेत. त्यांच्या सुनेला पक्षात येण्यासाठी सांगत आहेत. अशा परिस्थितीत घोसाळकर कुटुंबावर दबाव टाकत राजकारण करणाऱ्या शिंदे आणि भाजपाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले आहे.
Comments are closed.